लिहता लिहता….

घर चाळत असताना तिची वही सापडली आठवणीने सारे रान हंबरू लागलं. ओळी वरून हात फिरवताना गतकालाचा कालपट सरकत राहिला. रेल्वे गाडी आपल्या पाठीमागे डब्बा घेऊन जात असावी तशी. मग ही प्रचंड ओढ तहान. तिच्या सहवासाची तहान आणि या तहाणीचा अंत करणार रसायन याची या जन्मात भेट होईल की नाही असा भला मोठा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

मग सकाळपासूनच प्रचंड दहशत माजवत राहिली अंगाच्या प्रत्येक भागात कीतीही गणिताची बेरीज करत बसलो तरी उत्तर तेच ते अन् तेच ते येत राहिले खरे तर गणिताचा खरा पाया लक्षात आला. आणि अचूक उत्तर पात्रात पडलं. तडफडणाऱ्या माशाला पाण्याची आवश्यकता असूनही पाण्याने माशाला झिडकारले. साऱ्या शक्याशक्यता संपुष्टात आल्या. एखाद्यावर जीव लावणे, म्हणजे मूर्खपणाच असू शकतो याचा प्रत्यय आला. सगळ्यात चांगलं झालं असेल ते आज सर्वांगाने जरी उध्वस्ततेचा प्रत्यय येत असला तरी आनंदाची लकेर ही येतच गेली. एका फसव्या बेजबाबदार माणसापासून आपण सूटलो. पुढचा अखंड प्रवास सुखाचा व्हावा यासाठी चाललेला हा अखंड महायज्ञ आजपासून तरी या महायज्ञात समिधा पडत राहतील आणि मला त्या टाकाव्या लागणार.

तुम्ही सांगता आमच्या पवित्र आत्म्यास नव्या आकाशाचा शोध घेण्यास सगळ्या पूर्वीच्या आठवणी सगळे जुने मार्ग सांगता पुसण्यास शोधण्यास लागता संपूर्ण नव्या जगाच्या जगाची नवे रस्ते, फुटत राहतो जीव जुन्या ओळखीच्या रस्त्यांसाठी आता नवे रस्ते नव्या वाटा हा नव्याने प्रवास.

मी असुरक्षित असताना पायाच्या आणि हाताच्या मिठीत स्वतःला घेतो आणि सुरक्षित असल्याचा भास निर्माण करतो. मनाची समजूत करून स्वतः स्वतः ची वकिली करतो. हळू चिंता आतपर्यंत येते आणि बोटाची सर्व नखे कटरने काढल्याप्रमाणे स्वतःला समजावून घेतो.

राजकारण

राजकारणाचा पू व्हावा
पुवात जगणारा हरेक अश्वत्थामा
आणि त्या घाणीत वळवळणारे घटनाबहाद्दर किडेः लोकनेता
सारेच असे दुर्गंधीयुक्त
श्वास घेतला की सडवणारे
श्वास रुकविला तरी गुदमरुन मारणारे
प्रिय, अशावेळी अशाकाळी
नसते कुणीच कुणासाठी
क्रुसावर चढणारे

भारतभूषण गायकवाडः